मुलीस फूस लावून पळविले, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:33+5:302021-08-23T04:20:33+5:30
यावल : शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने १५ ऑगस्ट रोजी फूस लावून पळवून नेल्याची घटना ...

मुलीस फूस लावून पळविले, गुन्हा दाखल
यावल : शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने १५ ऑगस्ट रोजी फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. पाच दिवसांनंतर पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील १७ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाइकांसह राहते. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तिच्या राहत्या घरात टीव्ही पाहात असताना तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून आणि आमिष दाखवत पळवून नेले.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांसह सर्व नातेवाइकांनी तिच्या मैत्रिणीकडे व नातेवाइकाकडे प्रत्यक्ष जाऊन शोध घेतला. पण त्यांची मुलगी कुठेच आढळली नाही. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.