मावशीकडे आलेल्या युवतीला पळविले
By Admin | Updated: May 19, 2014 02:02 IST2014-05-19T02:02:00+5:302014-05-19T02:02:00+5:30
मावशीला आईसह भेटण्यासाठी आलेल्या युवतीला तिच्या मित्राने आमिष दाखवून पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

मावशीकडे आलेल्या युवतीला पळविले
जळगाव : शिवकॉलनी भागातील आपल्या मावशीला आईसह भेटण्यासाठी आलेल्या जबलपूर येथील अल्पवयीन युवतीला तिच्या मित्राने आमिष दाखवून पळविल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. जबलपूर येथील रहिवासी असलेल्या लता श्रीचंद्रशेखर कुरील (वय-४७) यांची शिवकॉलनी भागात बहीण राहते. बहिणीला मुलगा झाल्यामुळे कुरील या आपल्या साडेसतरा वर्ष वय असलेल्या मुलीसह शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाल्या. शिवकॉलनी येथील बहिणीच्या घरी शनिवारी रात्री सर्व जण झोपल्यानंतर मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अल्पवयीन युवती घरातून गायब झाली. सकाळी नातेवाइकांनी युवतीचा शोध घेतला असता ती सापडली नाही. या दरम्यान आपल्या मुलीला कोणतेतरी आमिष दाखवून संशयित रोहित कुमार उर्फ पंजाबी उर्फ दिपू प्रवीण शर्मा (रा.जबलपूर) या तरुणाने पळवून नेल्याचा संशय लता कुरील यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार रोहित शर्मा याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एआरटी सेंटरजवळ आढळला मृतदेह जिल्हा रुग्णालयातील ए.आर. टी.सेंटरजवळ रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक ५० ते ५५ वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अंगात निळा व पिवळा शर्ट, तपकिरी पॅन्ट असे या मयताचे वर्णन आहे. याप्रकरणी डॉ.स्वाती पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास हे.कॉ.अनिल तायडे करीत आहेत.