सिक्कीम राज्यातील दोन अल्पवयीन मुलींसह तरुणी भुसावळ आरपीएफच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:51 IST2017-07-18T15:51:33+5:302017-07-18T15:51:33+5:30
सिक्कीम येथील दोन अल्पवयीन मुलींना पुणे येथे घेऊन जात असताना आरपीएफच्या सर्तक पथकाने या मुलींना जळगाव येथील रेल्वे स्थानकावर उतरवून भुसावळ येथे आणले आहे.

सिक्कीम राज्यातील दोन अल्पवयीन मुलींसह तरुणी भुसावळ आरपीएफच्या ताब्यात
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.18 - सिक्कीम येथील दोन अल्पवयीन मुलींना पुणे येथे घेऊन जात असताना आरपीएफच्या सर्तक पथकाने या मुलींना जळगाव येथील रेल्वे स्थानकावर उतरवून भुसावळ येथे आणले आहे. आझाद हिंद एक्स्प्रेसने या मुली पुणे येथे जात होत्या. यातील दोन अल्पवयीन मुली हरविल्याबाबची नोंद सिक्कीम पोलिसांकडे आहे. यातील तिसरी तरुणी ही 25 वर्षाची आहे. ती या मुलींना पुणे येथे घेऊन जात असल्याच्या माहितीवरून आरपीएफने जळगाव येथे या मुलींना उतरवून घेतले. या मुली सध्या भुसावळ येथील आरपीएफच्या ताब्यात आहेत. सिक्कीम पोलीस भुसावळ येथे या मुलींना घेण्यासाठी निघाले असल्याची माहिती आरपीएफचे निरीक्षक व्ही.के.लांजिवार यांनी दिली.