शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:08 IST

निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल

जळगाव : गेल्या ७० वर्षांपासून सर्वांच्या ह्रदयावर लागलेला काश्मीरातील ३७० कलमची जखम पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या पुढाकाराने दूर झाली असून आगामी काळ हा काश्मीरसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ ठरणार आहे, असा विश्वास गिरीश महाजन यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संघटनात्मक बैठकीत व्यक्त केला. या निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल असून तेथील जीवनमान बदलण्यास मोठी मदत होणार आहे. सोबतच तिहेरी तलाकबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाने मुस्लीम भगिणी खूष आहे. त्यामुळे भविष्यात मुस्लीम बांधवच भाजपला सर्वात जास्त मतदान करतील, असा दावाही महाजन यांनी या वेळी केला.आगामी विधानसभा निवडणुकीतही नियोजन केल्यास आपले हमखास यश आहे, असे सांगत त्यांनी दोन महिने मेहनत करा, आता कच खाऊ नका, असा सल्ला उपस्थितांना दिला.नाथाभाऊ माझे पाठीराखेचपूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे सर्वांच्या टीकेचे धनी ठरलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ एकनाथराव खडसे पुढे सरसावले होते. माध्यमांनी गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया खडसेंनी महाजन यांची पाठराखण करताना दिली होती. या विषयावर गिरीश महाजन यांना या बैठकीनंतर विचारले असता ते म्हणाले की, नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करत असतो. परंतु, तुम्हाला माध्यमांना भलतंच काहीतरी वाटत असते. नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली हे चांगलंच झालं, अशी प्रतिक्रियाही महाजन यांनी दिली. महाजन आणि खडसे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र, महाजन यांनी सावध प्रतिक्रिया देत आमच्यात सारं काही आलबेल असल्याचे भासवले. त्यामुळे खडसे व महाजन समर्थकांच्या भुवया उंचावल्या.या वेळी गिरणा धरणात जळगाव जिल्ह्यातील इतर धरणांसाठी पाणी सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी निवडणूक पुढे ढकण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले की, त्यांना स्वायत्तता आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करावी. तसेच पूरग्रस्तांसाठी निधीचे नियोजन केले असून तो कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मराठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांची सोय केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव