राज्याच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 14:51 IST2019-11-23T14:48:20+5:302019-11-23T14:51:09+5:30
गिरीश महाजन, माजी पालकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते

राज्याच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला
सध्याची राजकीय परिस्थीती पाहता दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्यच नव्हते. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्याकडे विवीध पर्याय असल्याची भूमिका सुरुवातीपासूनच मांडली. राज्यातील बिकट स्थिती लक्षात घेऊन राज्याच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे आवश्यक बहुमत असून विहीत मुदतीत ते सिध्द करु, अशी प्रतिक्रिया जळगावचे माजी पालकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.