देवपुरात घरफोडी, 43 हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: November 16, 2015 20:22 IST2015-11-16T20:22:34+5:302015-11-16T20:22:34+5:30

देवपुरात घरफोडी करून चोरटय़ांनी 43 हजारांचा ऐवज लंपास केला आह़े

Ghodhodi in Godpura, 43 thousand rupees lump | देवपुरात घरफोडी, 43 हजारांचा ऐवज लंपास

देवपुरात घरफोडी, 43 हजारांचा ऐवज लंपास

धुळे : देवपुरात घरफोडी करून चोरटय़ांनी 43 हजारांचा ऐवज लंपास केला आह़े ऐन दिवाळीत चोरटय़ांनी ही संधी साधली़ याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

नरेंद्र जगन्नाथ टेकाडे (वय 30 रा़ गोरेवाड रोड, नागपूर, ह़मु दीप कॉम्प्लेक्स, देवपूर) हे दिवाळी सणानिमित्त गावी गेले होत़े त्यामुळे त्यांचे घर बंद होत़े ही संधी साधत चोरटय़ांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कम्प्युटर, लॅपटॉप, दोन भारत गॅस कंपनीचे सिलिंडर व एक टी़व्ही. असा एकूण 43 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला़ 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली़ नरेंद्र टेकाडे हे गावाहून परतल्यानंतर चोरीची घटना समोर आली़ त्यांनी देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध भादंवि कलम 454, 457 व 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक डी़ पी़ ढोके करीत आहेत़

Web Title: Ghodhodi in Godpura, 43 thousand rupees lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.