शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल बुकी प्रकरणातील घनश्याम अग्रवाल यांचे भाजपाच्या फलकावर छायाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:00 IST

चोपड्यात रंगतेय चर्चा

ठळक मुद्देशहराध्यक्षांचा दावा फलकाने केला फोलनेते म्हणून उल्लेख

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - आयपीएल बुकी प्रकरणात घनश्याम ओंकार अग्रवाल यांचा भाजपाशी संबंध नसल्याचा दावा भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला असला तरी भाजपाच्या फलकावर घनश्याम अग्रवाल हे भाजपाचे नेते असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शहराध्यक्षांचा दावा या फलकाने फोल ठरविला आहे.चोपडा येथील भाजपाचे नेते घनश्याम अग्रवाल यांना आयपीएल बुकी प्रकरणात रायगडातील खालापूर पोलिसांनी कारवाई करताच भाजपाची बदनामी टाळण्यासाठी शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी तातडीने पत्रकार परिषद घेतली होती. घनश्याम अग्रवाल भाजपाचा कोणताही सदस्य नाही व पदाधिकारीदेखील नाही. त्यांची ११ वर्षांपूर्वी भाजपमधून हकालपट्टी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र शहरात नुकत्याच झालेल्या अपंग शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर फलक लावण्यात आले होते, त्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. त्यावर अग्रवाल यांचेही छायाचित्र असून नेते म्हणून त्यावर उल्लेख केलेला आहे.विशेष म्हणजे भारत सरकारचा शासकीय लोगोही त्या बॅनरवर लावण्यात आला आहे. इतक्या दिवसांपासून अग्रवाल हे तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यीतील मोठ्या दिग्गज नेत्यांना ते भाजपा नेते म्हणून चालत होते.अचानक आयपीएलसाठी सट्टा बुकी म्हणून अग्रवाल यांना खालापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपाच्या शहर प्रमुख नरेंद्र पाटील यांना घनश्याम अग्रवाल हे भाजपाचे नसल्याचे कसे सुचले? तर भाजपाच्या अंगाशी येऊ नये म्हणून भाजपाने कांगावा केला असल्याची चर्चा आहे.फलकाच्या खाली भाजपा युवा पार्टीचे सागर पठार, भाजपा शहर उपाध्यक्षा अलका प्रवीण पाटील, चोसाकाचे व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, सूतगिरणीचे संचालक शशिकांत पाटील यांचीही नावासह छायाचित्रे आहेत. या फलकांची दिवसभर चर्चा होत होती.

 

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव