आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - आयपीएल सट्टा बेटींगप्रकरणी कर्जत येथील न्यायालयाने भाजपा नेते घनश्याम अग्रवाल यांना आज जामीन मंजूर केला आहे.रायगड गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांनी आयपीएल मॅचेसवर सट्टा बेटिंग करणाऱ्यांवर संयुक्तपणे छापा टाकत अटक केली होती. त्यात ५ रोजी भाजपा नेते घनश्याम अग्रवाल यांना चोपडा येथील निवासस्थानी येत ताब्यात घेण्यात आले होते. कर्जत न्यायालयात न्यायाधिश सी.जे.डोलारे यांनी त्यांना जामीन मंजूर केला आहे.अग्रवाल यांच्याकडून अॅड.जी.बी. गिरधारी, अॅड.एस.टी. वाडेकर, अॅड. महेश अग्रवाल यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी वकील महेश कांबळे यांनी पूर्ण तपास झाला आहे, असे सांगितल्याने अखेर त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयात तपासअधिकारी महेश शेलार सहायक पोलीस निरीक्षक यांनी पोलिसांची बाजू मांडली होती.सदर गुन्हा हा चौक जि.रायगड या ठिकाणी झालेला असून, मला तीन दिवसांनंतर म्हणजे ५ रोजी माझ्या घरून खालापूर या ठिकाणाहून तपास कामी घेऊन गेले होते. तपासात मी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. पोलिसांनी पूर्ण चौकशी केली. घटनेशी माझा काही एक संबध नाही हे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी परत चौकशीची गरज नाही म्हणून सरकारी वकिलांनी कुठलाही युक्तीवाद न केल्याने कर्जत न्यायालयाने आज मला जामीन दिला आहे. घटनेतील सर्व सत्य बाहेर येईलच, माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.-घनश्याम अग्रवाल, चोपडा
आयपीएल सट्टा प्रकरणी घनश्याम अग्रवाल यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:05 IST