ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकर पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:07+5:302021-06-18T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्येष्ठांना अडचणी नको म्हणून त्या आधी ४५ ...

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकर पूर्ण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्येष्ठांना अडचणी नको म्हणून त्या आधी ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असा सल्ला टास्कफोर्सने बैठकीत यंत्रणेला दिला आहे. त्या दृष्टीने आता नियोजन सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अद्यापही आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक यांचे दुसरे डोस बाकी असून त्या दृष्टीने ते पूर्ण करण्यासाठी आता प्रत्येक केंद्रावर यांची यादी देण्यात आली आहे. त्यांना फोन करून बोलवून त्यांचे हे डोस पूर्ण करून घ्यावे, असे नियेाजन करण्यात येणार आहे. यासह वॉर्डनिहाय, शाळानिहाय केंद्र सुरू करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सेशन सुरूच असल्याचे आरेाग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, परदेशात जाणाऱ्या १८ वर्षांपुढील सर्व वयोगटासाठी केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. या लोकांनी दोन डोसमधील अंतर हे २८ दिवसांचे असून अन्य सामन्यांसाठी हे अंतर ८४ दिवसांचे असल्याचे डॉ.समाधान वाघ यांनी सांगितले.
विभागीय आयुक्तींनी घेतला आढावा
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आगामी तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची नेमकी स्थिती काय याबाबत आढावा घेतला. जिल्ह्यातील तयारीविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी माहिती दिली. अन्य पाच प्रकल्पांचेही कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. आधीच्या पाच प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झाली आहे. यात जीएमसीत दोन प्रकल्प असून त्याबाबत माहिती देण्यात आली.