मन्यारखेडा शिवारातून जनरेटर चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST2021-05-01T04:15:04+5:302021-05-01T04:15:04+5:30
जळगाव : मन्यारखेडा शिवारातील पत्र्याच्या शेडमधून जनरेटर, वजनकाट्यासह इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या ...

मन्यारखेडा शिवारातून जनरेटर चोरी
जळगाव : मन्यारखेडा शिवारातील पत्र्याच्या शेडमधून जनरेटर, वजनकाट्यासह इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक पंडित पाटील हे शिक्षक कॉलनीतील रहिवासी आहेत. त्यांची मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीत पत्र्याची शेड आहे. त्यात ठेवलेले २० हजार रुपये, कंपनीचा जनरेटर आणि १० हजार रुपये किमतीचा वजनकाटा, पाण्याची मोटार, जाळ्या आणि सहा फावडे असा एकूण मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. परिसरात शोधाशोध करून काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी अखेर नशिराबाद पोलीस ठाणे गाठले. अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. महेंद्र पाटील करीत आहेत.