महाप्रबंधकाची रेल कामगार सेनेशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:20+5:302021-09-25T04:15:20+5:30
लॉन कामाबद्दल केली तक्रार भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने मुख्य अभियंत्यांच्या ए-३ या बंगल्यात सौंदर्यींकरणासाठी लॉन तयार केले ...

महाप्रबंधकाची रेल कामगार सेनेशी चर्चा
लॉन कामाबद्दल केली तक्रार
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने मुख्य
अभियंत्यांच्या ए-३ या बंगल्यात सौंदर्यींकरणासाठी लॉन तयार केले आहे. हे काम नित्कृष्ट असल्याची तक्रार ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे. याची चौकशी झाल्याशिवाय बिल अदा करू नये, अशी तक्रार वेल्हाळे येथील रहिवासी व बोदवड बाजार समितीचे संचालक योगेश पाटील यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे.
डीआरएम केडिया यांचा सत्कार
भुसावळ : रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे संरक्षण दल, भुसावळ विभागाच्या सदस्यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन २३ रोजी केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डीआरएम एस. एस. केडिया यांचा आरपीएफच्या कॅम्पने सत्कार केला. या समारंभात मान्यवरांसोबत रेल्वेचे इतर शाखा अधिकारी आणि प्रमुख अतिथी उपस्थित होते. हर्ष अग्नीने परेड सलामी दिली. यात रेल्वे संरक्षण दलाच्या २ तुकड्या आणि आरपीएफची १ तुकडी सहभागी झाली. याचबरोबर
देशभक्तीपर संगीत, सांस्कृतिक नृत्य आदी कार्यक्रमांसह रेल्वे परिसरात प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आरपीएफच्या सदस्यांनी नुक्कड नाटक सादर करीत जनजागृतीचा संदेश दिला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना स्मरणिका देऊन सन्मानित करण्यात आले.