महाव्यवस्थापकांनी केली तिसऱ्या रेल्वे मार्गाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:20 IST2021-02-27T04:20:38+5:302021-02-27T04:20:38+5:30
रेल्वे पोलिसांच्या श्वान पथक कार्यालयाचे उद्घाटन जळगाव : भुसावळ दौऱ्यावर आलेल्या मध्य रेल्वेेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याहस्ते नुकतेच भुसावळ ...

महाव्यवस्थापकांनी केली तिसऱ्या रेल्वे मार्गाची पाहणी
रेल्वे पोलिसांच्या श्वान पथक कार्यालयाचे उद्घाटन
जळगाव : भुसावळ दौऱ्यावर आलेल्या मध्य रेल्वेेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याहस्ते नुकतेच भुसावळ येथे श्वान पथक कार्यालयाचे उद् घाटन करण्यात आले. यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता, सुरक्षाबलाचे आयुक्त क्षितीज गुरव उपस्थित होते. यावेळी महाव्यवस्थापकांनी रेल्वे पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्राची व मैदानाचींही पाहणी केली.
रेल्वे स्टेशनवर कोरोनाबाबत जनजागृती
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवर कोरोनाबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. प्रवाशांना ध्वनीक्षेपणाद्वारे मास्क व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.तर विना मास्क प्रवाशांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
सरकते जीने सुरू करण्याची मागणी
जळगाव : रेल्वे स्टेशनवर गेल्या काही महिन्यांपासून सरकते जीने बंद असल्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या रेल्वे सेवा सुरू असल्यामुळे, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने सरकते जीने सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
स्टेशनसमोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशन समोर मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्या थाटल्यामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत आहे. या प्रवाशांना स्टेशनबाहेर पडतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.