गावपुढा:यांनीच चोरला मका
By Admin | Updated: May 8, 2017 00:47 IST2017-05-08T00:47:21+5:302017-05-08T00:47:21+5:30
डोणगाव : शेतक:यावर संकट

गावपुढा:यांनीच चोरला मका
यावल : तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या मात्र हल्ली गणेश भालेराव यांच्या ताब्यात असलेल्या शेत गट नं. 38/1 व 2 मधून
दोन लाख 83 हजार रुपयांचा सहा ट्रॅक्टर भरलेल्या 210 क्विंटल मक्याची उपसरपंचांसह सदस्यांनी चोरी केल्याचा विचित्र प्रकार उघड झाला असून याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
6 मे च्या रात्री उपसरपंचासह सदस्यांनी मका चोरून नेल्याचा आरोप शेतक:याने केला आह़े डोणगाव येथील शेत गट नं. 38/1 व 38 /2 हे 24 बिघे शेत ग्रामपंचायतीच्या मालकीचे आहे तर सध्या हे शेत गावातील गणेश पंडित भालेराव यांच्या ताब्यात आहे. या शेतातून सहा ट्रॅक्टरमध्ये भरलेला 210 क्विंटल मका (किंमत सुमारे दान लाख 83 हजार) चंद्रकांत अभिमन पाटील, सुधीर अभिमन पाटील, उपसरपंच विनोद शालीक पाटील, ग्रा.पं.सदस्य एकनाथ पाटील, नीलेश पाटील, मंदाकिनी पाटील, सरलाबाई पाटील, विजय पाटील, पंजाबराव पाटील, शालिक दौलत पाटील हिरामण शालिक पाटील, व त्यांच्या सोबतच्या 20 ते 25 जणांनी 6 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लांबवला़
राजकीय वतरुळात मोठी खळबळ
गणेश भालेराव यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. 54/17 भादंवि कलम 379, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे करीत आहेत़ या घटनेने ग्रा़पं़च्या राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े