गॅस टँकरने दिली कारला धडक
By Admin | Updated: September 24, 2015 00:13 IST2015-09-24T00:13:00+5:302015-09-24T00:13:00+5:30
धुळे : धावत्या गॅस टॅँकरचा अचानक पुढचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टॅँकर समोरून येणा:या कारला धडकला.

गॅस टँकरने दिली कारला धडक
धुळे : धावत्या गॅस टॅँकरचा अचानक पुढचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टॅँकर समोरून येणा:या कारला धडकला. हा अपघात 21 सप्टेंबरला सकाळी 8.20 वाजेच्या सुमारास नागपूर-सुरत महामार्गावर मोराणे, ता.धुळे शिवारातील इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ झाला. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात टॅँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू मुन्नालाल ओझा (28, रा.धोदा, जि.मुरेना, मध्य प्रदेश) हा (जीजे 6 टीटी 9340) क्रमांकाचा गॅस टॅँकर धुळ्याकडून साक्रीकडे घेऊन जात होता. महामार्गावर या टॅँकरचा पुढचा टायर अचानक फुटल्याने टॅँकर समोरून येणा:या (एमएच 39 जे 5849) क्रमांकाच्या कारला धडकला. या अपघातात अशीद जालमसिंग नाईक (21, रा.नवापूर) व हेमंत प्रतापसिंग नाईक (20, रा.खांडबारा) हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी हे. कॉ. के.एम. दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टॅँकरचालक विष्णू ओझा याच्यावर भादंवि कलम 279, 337, 338, 427 सह मोटारवाहन कायदा कलम 14, 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा प्रिंटिंग प्रेस चालू करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह चौघांवर नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयश्री ललितकुमार वाघ (रा.श्रीरामनगर, जळगाव, ह.मु. वाघाडी बुद्रूक, ता.शिंदखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी ललितकुमार प्रल्हाद वाघ, प्रल्हाद कौतिक वाघ, मालतीबाई प्रल्हाद वाघ, वंदनाबाई दिलीप पाटील (सर्व रा.श्रीरामनगर, जळगाव) यांनी 22 मे 2014 ते 9 नोव्हेंबर 2014 या काळात फिर्यादी जयश्री वाघ यांचा, माहेरून एक लाख रुपयांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांच्या अंगावरील पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व 20 ग्रॅमची सोन्याची मंगळचेन काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर भादंवि कलम 498 (अ), 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.