चितोड नाक्याजवळ गॅस टँकर उलटला
By Admin | Updated: November 19, 2015 23:46 IST2015-11-19T23:46:01+5:302015-11-19T23:46:01+5:30
धुळे : चितोड नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) कंपनीचा गॅस टॅँकर उलटला.

चितोड नाक्याजवळ गॅस टँकर उलटला
धुळे : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यावर असणा:या चितोड नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) कंपनीचा गॅस टॅँकर उलटला. चालकाचे टॅँकरवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. त्यात सुदैवाने गॅस गळती झाली नाही. हा टॅँकर उचलण्याचे काम रात्री उशिरार्पयत सुरू होते. पोलीस प्रशासनाने या कामासाठी उच्च क्षमतेचे दोन क्रेन मशीन घटनास्थळी मागवले होते. गुजरात राज्यातील हाजिरा येथे असणा:या प्लॉन्टमधून गॅस भरून (एमएच 46 एच 3406) क्रमांकाचा टॅँकर (कॅप्सूल) अहमदाबादमार्गे औरंगाबादला जाण्यासाठी निघाला होता. या टॅँकरमध्ये सुमारे 18.5 टन इतका लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस भरलेला होता. नागपूर-सुरत महामार्गावर धुळे शहरानजीक चितोड नाका परिसरात आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टॅँकर अचानक रस्त्याच्या कडेला उलटला. या घटनेची माहिती होताच पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव हे सहकारी अधिकारी व कर्मचा:यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला नागरिकांना गॅस टॅँकरपासून दूर केले. त्यानंतर टॅँकरच्या प्रेशर गेजची तपासणी करून गॅस गळती होत आहे किंवा नाही, याची खात्री केली. गॅस गळती होत नसल्याचे दिसल्यानंतर टॅँकर उचलण्यासाठी शहरातून दोन क्रेनमशीन मागविण्यात आल्या. रात्री उशिरार्पयत हे काम सुरू होते. या घटनेची माहिती कंपनीच्या अधिका:यांना देण्यात आली आहे, असे पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.