गॅस गळतीने घराला आग लागून नुकसान
By Admin | Updated: January 8, 2017 00:04 IST2017-01-08T00:04:24+5:302017-01-08T00:04:24+5:30
धुळे : गॅस गळती होऊन घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोरशेवडी येथे घडली़

गॅस गळतीने घराला आग लागून नुकसान
धुळे : गॅस गळती होऊन घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोरशेवडी येथे घडली़ आगीत रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सदर घटनेची धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आह़े
मोरशेवडी येथे राहणारे दूध विक्रेते सुनील आवडाजी गवळी (वय 35) यांच्या घरवजा झोपडीतील गॅस सिलिंडरमधून अचानक गॅस गळती होऊन आग लागली़ त्यात संपूर्ण घरातील संसारोयोगी साहित्य जळून खाक झाल़े तसेच 20 ते 22 हजार रुपयांची रोख रक्कमही जळून नुकसान झाल़े याबाबत त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अगAीउपद्रवाची नोंद करण्यात आली आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दामोदर करत आहेत़ या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंब उघडय़ावर आले आह़े