गॅस लिक झाल्याने सिलिंडरने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:40+5:302021-09-14T04:21:40+5:30
अमळनेर : कामगारांच्या निष्काळजीपणामुळे गॅस लिक झाल्याने सिलिंडरने अचानक पेट घेतला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या ...

गॅस लिक झाल्याने सिलिंडरने घेतला पेट
अमळनेर : कामगारांच्या निष्काळजीपणामुळे गॅस लिक झाल्याने सिलिंडरने अचानक पेट घेतला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बहादरपूर रोडवर उर्दू शाळेजवळ घडली. घरमालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला.
अजय हिरालाल महाजन यांच्याकडे सिलिंडर संपल्याने त्यांनी दुपारी नवीन सिलिंडर मागविले, मात्र ते लिक होत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यास कळविले असता त्याने मी आता लांब निघून आलो आहे. कोणीतरी रिक्षावाल्याला सांगून लिकेज बंद करून घ्या असा अजब सल्ला दिला. अजय महाजन यांनी एकाला बोलावून लिकेज बंद करण्याचे सांगितले. एका रिक्षाचालकाने लिकेज बंद झाल्याचे सांगितले; मात्र अजय महाजन यांच्या पत्नीने गॅस पेटवताच सिलिंडरने पेट घेतला. महाजन यांचे कुटुंब धास्तावले. अजय याने पेटते सिलिंडर घराबाहेर आणून फेकले, मात्र ते विझले नाही. रस्त्याने जाणारे शशांक संदानशिव यांनी अग्निशामक दलाला कळविल्यावर नितीन खैरनार, दिनेश बिऱ्हाडे, जफर खान हे अग्निशामक बंब घेऊन पोहोचले त्यांनी पाणी मारले तोपर्यंत अजय महाजन स्वतः इंडेन गॅस ऑफिसमध्ये तक्रार करायला गेले. एक तासांनंतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचला ओला कापड लावून आग विझविण्यात आली.