गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले, आता मोजा ८६५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:41+5:302021-08-20T04:20:41+5:30

महागाईचा मार : आठ महिन्यांपासून सातत्याने दरवाढ सुरूच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडच्या काळात आधीच अर्थव्यवस्था डगमगली असताना, ...

Gas cylinders went up by Rs 25 again, now at Rs 865 | गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले, आता मोजा ८६५ रुपये

गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले, आता मोजा ८६५ रुपये

महागाईचा मार : आठ महिन्यांपासून सातत्याने दरवाढ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविडच्या काळात आधीच अर्थव्यवस्था डगमगली असताना, सामान्यांचे बजेट कोलमडलेले असताना नियमित वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ मात्र थांबत नाही. यामुळे सामान्यांवरील आर्थिक बोजा वाढत असून, गेल्या आठ महिन्यांत १६६ रुपयांनी सिलिंडरचे दर वाढले आहेत. ऑगस्ट महिन्यात पुन्हा २५ रुपयांनी दरवाढ झालेली आहे. आता हे सिलिंडर ८६५ रुपयांना मिळणार आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ होत असल्याने आर्थिक बजेट कोलमडत असल्याचे चित्र आहे. त्यात शहरात चुली पेटविणार कशा, असा प्रश्न सामान्य गृहिणींमधून विचारला जात आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून सबसीडीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांना हा गॅस परवडणार कसा, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चुलींचाच अधिकाधिक वापर होताना दिसत आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत अनेकांना गॅस मिळाला खरा, मात्र सिलिंडर आवाक्यात नसल्याने ते वापरणार कसे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

छोट्या सिलिंडरचे दर जैसे थे

- एकीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला कमीअधिक प्रमाणात वाढतच आहेत.

- दुसरीकडे ५ किलोचे छोटे सिलिंडर यांचे दर जैसे थैच ठेवण्यात आले आहेत.

- मात्र, या सिलिंडरला आता तेवढी मागणी नसल्याचे काही वितरकांनी सांगितले.

व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त

व्यावसायिक वापरासाठी लागणारे सिलिंडर हे पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. आधी या सिलिंरची किंमत १६५३ होती ती आता १६४८ झाली असल्याची माहिती भूषण गॅसचे अजय ठोंबरे यांनी दिली.

आठ महिन्यांत १६६ रुपयांची वाढ

जानेवारी - ६९९.५०

फेब्रुवारी - ७२४.५०

मार्च - ८१४.५०

एप्रिल - ८१४.५०

मे- ८१४.५०

जून - ८१४.५०

जुलै - ८४०

ऑगस्ट - ८६५

Web Title: Gas cylinders went up by Rs 25 again, now at Rs 865

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.