अंजुमन संस्थेतील वादाच्या पार्श्वभूमीवर गरुड यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:23+5:302021-09-07T04:21:23+5:30
जामनेर : अंजुमन तरक्की शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद मिटून शाळेत पुन्हा चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, विद्यार्थी व पालकांच्या ...

अंजुमन संस्थेतील वादाच्या पार्श्वभूमीवर गरुड यांची भेट
जामनेर : अंजुमन तरक्की शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद मिटून शाळेत पुन्हा चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, विद्यार्थी व पालकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांची भेट घेतली. यात कोणताही राजकीय विषय नव्हता, अशी माहिती भाजपचे नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष अनिस शेख, रिझवान शेख आदींनी सोमवारी आमदार महाजन यांच्या निवासस्थानी बोलताना दिली.
नगरसेवक रिझवान शेख यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षांपासून अंजुमन शिक्षण संस्थेत वाद असल्याने कार्यकाळ संपूनही निवडणूक झालेली नाही. या शैक्षणिक वादावर तोडगा काढण्यासाठी गरुड यांची भेट घ्यावी, असा आग्रह केला. याबाबतीत आम्ही आमदार महाजन यांना सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांना दिले. शैक्षणिक संस्थेत राजकारण नको, अशी महाजन व गरुड यांची भूमिका आहे. दोघांच्या सहकार्यानेच संस्थेतील वाद मिटतील, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला. या वेळी अनिस शेख बिस्मिल्ला, रिझवान शेख, नाजीम शेख, नुरुद्दीन शेख, फारूक मणियार, असिफ शेख, एल.एस. खान, शरीफ मन्सुरी, निहाल पहिलवान, अय्युब पहिलवान, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, अतिश झाल्टे, सुहास पाटील आदी उपस्थित होते.