शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

गणपतराव पोळ यांनी घडविले खो-खो खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:28 IST

आकाश नेवे जळगाव : जळगावच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सातत्याने खो-खोचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. त्यामागे आहे ...

आकाश नेवेजळगाव : जळगावच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सातत्याने खो-खोचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. त्यामागे आहे ती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ यांची सुमारे अर्धशतकांपेक्षा जास्त वर्षे सुरू असलेली तपस्या. एखाद्या परमभक्ताने नित्यनेमाने आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनासाठी मंदिरात जावे, त्याच नित्यनेमाने आणि श्रद्धेने गणपतराव पोळ दररोज खो-खो शिकवण्यासाठी मैदानावर जात आहेत. त्यांच्या गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो खेळाडू घडवले आहेत.१९६६ मध्ये गणपतराव पोळ यांच्या नेतृत्वात खो-खोच्या विकासासाठी फ्रेंड्स चेंबरची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून खो-खोच्या विकासाला एक शिस्तबद्ध स्वरुप आले. त्यावेली पोळ हे ला.ना. सार्वजनिक विद्यालयात एन.डी.एस. क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. सुमारे १४ वर्षे खो-खोचा सराव शाळेच्या मैदानात होत होता. त्यानंतर १६ वर्षे नुतन मराठा महाविद्यालयात खो-खोचा सराव होत राहिला. नंतर २००४ साली तीन वर्षे आर.आर. विद्यालय आणि नंतर शिवतीर्थ मैदानावर सराव होत होता. सध्या खो-खोचे प्रशिक्षण आणि सराव जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर होत आहे. पोळ हे लहान असताना बळीराम पेठेतील खांबेटे व्यायामशाळेत जात असत. तेथेच त्यांना खेळाची गोडी लागली. त्या काळात कुस्ती, गोळाफेक, लेझीम हे त्यांचे आवडते खेळ होते. १९६४ मध्ये मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या एन.डीएसआयचे प्रशिक्षण सरिस्का, राजस्थानमध्ये घेतले. त्यानंतर नेहरु विद्या मंदिर, तळवेल ता. भुसावळ येथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करण्यास सुरूवात केली.या काळात त्यांना बी.डी. पाटील, डॉ. अविनाश आचार्य, प्रा.पु.ग.अभ्यंकर, गोवर्धन राठी यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी खेळाडूंच्या विकासासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. १९९७० ते १९८० या काळात ही शिबिरे आयोजित केली. त्यानंतर राज्य संघाची शिबिरे घेत आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे कार्य ते आजही करतात.अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खो-खो स्पर्धा जळगाव शहरात आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात गणपतराव पोळ यांचा सिंहाचा वाटाआहे.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव