दरोडय़ाच्या प्रयत्नातील टोळी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

By Admin | Updated: May 4, 2017 13:10 IST2017-05-04T13:10:34+5:302017-05-04T13:10:34+5:30

चौघे अटकेत, एक पसार, रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची कारवाई

A gang of dacoits in the trap of Bhusawal railway police | दरोडय़ाच्या प्रयत्नातील टोळी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

दरोडय़ाच्या प्रयत्नातील टोळी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

 भुसावळ ,दि.4- डाऊन साईड आऊटरवर रेल्वे गाडय़ांमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या महात्मा फुले नगरातील अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाला संयुक्त कारवाईत यश आल़े चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आह़े गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़

इम्रान उर्फ इम्मू इमाम पिंजारी (19), अमिन इमाम पिंजारी (25), इमाम हसन पिंजारी (62, सर्व रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) व धीरज उर्फ सन्नाटा लक्ष्मण चावरीया (20, रा़आठ खोली, भुसावळ) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत तर अहमद अटॅक (मच्छीवाडा, भुसावळ) हा पळून जाण्यात यशस्वी झाला़ आरोपींच्या ताब्यातून दोन चाकू, मिरची पूड, लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली़ अटकेतील आरोपींविरुद्ध यापूर्वी देखील चोरी, दरोडय़ाचे अनेक गुन्हे दाखल आहेत़ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही़क़ेलांजीवार व लोहमार्गचे निरीक्षक डी़बी़सरक यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सापळा रचून गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली़ 

Web Title: A gang of dacoits in the trap of Bhusawal railway police