गणेश कॉलनीत भरदिवसा घरफोडीत 4 लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: April 28, 2017 14:41 IST2017-04-28T14:41:44+5:302017-04-28T14:41:44+5:30
गणेश कॉलनी भागातील प्रीतेश सुभाषचंद लोढा यांच्या बंद घरात चोरटय़ांनी शुक्रवारी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास धाडसी घरफोडी 4 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघड झाली आहे.

गणेश कॉलनीत भरदिवसा घरफोडीत 4 लाखांचा ऐवज लंपास
>जळगाव, दि.28 - गणेश कॉलनी भागातील प्रीतेश सुभाषचंद लोढा यांच्या बंद घरात चोरटय़ांनी शुक्रवारी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास प्रवेश केला. या धाडसी घरफोडीत चोरटय़ांनी 4 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघड झाली आहे.
प्रीतेश लोढा यांच्या नातेवाईकांच्या कुटुंबातील विवाहाचा कार्यक्रम ओसवाल मंगल कार्यालयात आहे. या ठिकाणी लोढा कुटुंबिय गेले होते. या दरम्यान चोरटय़ांनी लोढा यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व 4 लाखांचा ऐवज लंपास केला. यात 13 तोळे सोने व 10 हजार रुपये रोख असा मुद्देमाल असल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय तृतीया असल्याने लोढा हे आंबे घेऊन घरी परत आले असता घरफोडीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.