शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भुसावळ येथे जागर प्रतिष्ठानतर्फे ग्रंथपूजन व जागर गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 3:43 PM

ग्रंथांचा जागर सशक्त समाजासाठी उपयुक्त - आमदार एकनाथराव खडसे

ठळक मुद्देतिघांना जागर गौरव पुरस्कार २०१८ प्रदानविविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांनी केले मार्गदर्शन

भुसावळ, जि.जळगाव : समाजात खऱ्या अर्थाने जागृती घडवून आणायची असेल तर पुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके संस्कारमय घडवणारी असल्याने या पुस्तकांचा मनुष्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात खूप मोठा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे या पुस्तकांचा जागर करणे ही एक सशक्त समाज घडविण्यासाठी आजची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे केले.येथील ब्राह्मण संघात जागर प्रतिष्ठानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित जागर गौरव सोहळा व ग्रंथपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील, प्रमुख पाहुणे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फलक, भुसावळ विभागीय पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण समिती सदस्य रवींद्र पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, पिंटू ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथ पूजन करण्यात आले.ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल विद्यालयातील शिक्षक महेंद्र भोई यांनी स्वलिखित जागर गीत सादर केले. त्यांना संस्कृती पाठक व मोहित जमोदकर यांनी संगीत साथ दिली. जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले.तिघांना जागर गौरव पुरस्कार २०१८ प्रदानसामाजिक व आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भुसावळ येथील बालरोग तज्ज्ञ डॉ.नीलिमा संजय नेहेते, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रमेश सरकाटे अशा तिघांना जागर गौरव २०१८ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात राज्यातून एसटीआय परीक्षेत तृतीय पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील व जागतिक पातळीवर इस्रो या बंगळुरू स्थित संस्थेत सादर केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाला पुरस्कार मिळालेल्या समीक्षा नितीन पाटील हिचादेखील गौरव करण्यात आला.यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष ऋषिकेश पवारश सचिव प्रा.नीलेश गुरुचल, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. हरिष कुमार पाटील, संचालिका लीना पाटील, प्रमिला सोनवणे, जागर मित्र डॉ.जगदीश पाटील, पवन पाटील, गोकुळ सोनवणे, विलास पाटील, रमेश कोळी, निर्मला दायमा, ज्ञानेश्वर घुले, अमित चौधरी यांनी परिश्रम घेतले. प्रा.जितेंद्र महंत यांनी आभार मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ