प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! धोकादायक प्रवास
By Admin | Updated: May 31, 2014 08:15 IST2014-05-30T20:06:04+5:302014-05-31T08:15:15+5:30
खाजगी लक्झरी बसमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांनी कसे बाहेर पडावे याबाबत बस सुरू होण्यापूर्वी कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने खाजगी बसमालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तीन वर्षात लक्झरी बसने पेट घेतल्याच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत.

प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! धोकादायक प्रवास
जळगाव : खाजगी लक्झरी बसमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांनी कसे बाहेर पडावे याबाबत बस सुरू होण्यापूर्वी कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने खाजगी बसमालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तीन वर्षात लक्झरी बसने पेट घेतल्याच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत.
प्रवाशांना दिल्या जात नाहीत सूचना
उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्झरी आणि खाजगी बस सेवा देताना बसमध्ये पब्लिक अँड्रेसेस सिस्टीमचा वापर करण्याची सूचना केली आहे. यात बसचालक व मालकांनी प्रवास सुरू होण्यापूर्वी आपत्कालीन दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे. त्याचा वापर कसा करावा. बे्रकेबल काच असल्यास ते फोडण्यासाठी लागणारी हातोडी कोणत्या ठिकाणी आहे. वाहनात अग्निशमन यंत्र कोठे आहे. त्याचा उपयोग कसा करावा याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. यासह आपत्कालीन दरवाजावर रात्रीच्या वेळी चमकणारे स्टीकर लावण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र याकडे बसचालकांचे दुर्लक्ष झालेले आहे.
इंधन टाकी मध्यवर्ती ठिकाणी असावी
काही महिन्यांपूर्वी हैद्राबाद रस्त्यावर खाजगी बसची इंधन टाकी फुटून लागलेल्या आगीत ४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावर नॅशनल ऑटोमोटीव्ह टेस्टींग आर ॲण्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ने (एनएटीआरआयपी) एक अहवाल सादर केला होता. त्यात इंधन टाकी बसच्या बाजूला बसविण्याऐवजी मध्यवर्ती भागात बसवावी, यावर भर दिला आहे. याकडे अद्याप कुणीही लक्ष देण्यास तयार नाही.
चालक व वाहकाला प्रशिक्षणाचा अभाव
खाजगी किंवा शासकीय बससेवेतील कर्मचार्यांना आपत्कालीन प्रसंगी काय करावे, याचे प्रशिक्षण अजूनही दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. बसचालक आणि वाहक यांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण सक्तीचे करणे गरजेचे आहे.
साहित्य तपासणीकडे दुर्लक्ष
खाजगी ट्रॅव्हलचालकांकडून लग्नसराई आणि दिवाळीच्या सुीच्या काळात प्रवाशांकडून दुप्पट भाडे वसूल केले जाते मात्र त्या प्रमाणात सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. जळगावातील खाजगी किंवा शासकीय अशा कोणत्याही बसमध्ये साहित्य तपासणी केली जात नाही. त्यामुळे खाजगी बसमध्ये रॉकेल, पेट्रोल व गॅसची वाहतूक सहज होत असते. ज्वलनशील साहित्याची तपासणी करण्याकडे बसचालक व वाहक दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार रोज होत आहे.