जुगार अड्ड्यावर छापा, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, आठ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:24+5:302021-06-03T04:13:24+5:30

बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पोलिसांनी गोपनीय माहितीवरून शहरातील जाममोहल्ला परीसरातील अमरदीप लॉजमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याचे समजताच सापळा रचून ...

Gambling den raided, Rs 15 lakh seized, eight arrested | जुगार अड्ड्यावर छापा, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, आठ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, आठ जण ताब्यात

बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पोलिसांनी गोपनीय माहितीवरून शहरातील जाममोहल्ला परीसरातील अमरदीप लॉजमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याचे समजताच सापळा रचून रंगात आलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारत आठ संशयितांना ताब्यात घेतले.

जावेदखान आकिबखान (३७) खडका रोड, उस्मानिया कॉलनी, विनोद प्रभाकर चौधरी (४५) शनिमंदिर, शेख तसलीम शेख मनवर (४२) खडका रोड, रामदेव बाबा मंदिराजवळ, अब्दुल नदीम अब्दुल रौफ (४०) जाम मोहल्ला, चिरोगोद्दीन शेख अहमद(४०) खडका चौफुली, मन्नत अपार्टमेंट, रहिम शेख गनी (४४) फकीरवाडा, सिराज मोहम्मद शेख (३६) फकीर वाडा, जाम मोहल्ला, फिरोजशहा बशीर शहा (२९) मुस्लीम कॉलनी यांना ताब्यात घेण्यात आले.

पो. कॉ. प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून ४५ हजार २७० रुपये जुगाराचे साहित्य व मोबाइल फोन मिळून १ लाख २५ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, पोलीस नाईक रवींद्र बिहाडे, कॉन्स्टेबल दिनेश कापडणे, परेश बिऱ्हाडे, सुभाष साबळे यांच्या पथकाने केली. तपास सपोनि गणेश धुमाळ करीत आहेत.

Web Title: Gambling den raided, Rs 15 lakh seized, eight arrested