गलवाडे येथे दोघांनी ५० हजारांची चोरी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST2021-07-09T04:12:32+5:302021-07-09T04:12:32+5:30

अमळनेर : बेडरूमचा अर्धवट उघडा दरवाजा लोटून दोघांनी घरातून सोन्याची पोत, मोबाइलसह सुमारे ५० हजारांचा ऐवज लंपास केल्याची ...

At Galwade, the two stole Rs 50,000 | गलवाडे येथे दोघांनी ५० हजारांची चोरी केली

गलवाडे येथे दोघांनी ५० हजारांची चोरी केली

अमळनेर : बेडरूमचा अर्धवट उघडा दरवाजा लोटून दोघांनी घरातून सोन्याची पोत, मोबाइलसह सुमारे ५० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ८ रोजी पहाटे गलवाडे बुद्रूक येथे घडली.

गोपाल पंडित बडगुजर या इलेक्ट्रिक व्यावसायिकाने ७ रोजी रात्री ११ वाजता घराचे सर्व दरवाजे बंद करून फक्त बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपी गेले. पहाटे ३ वाजता उठून त्यांनी मोबाइल चार्जिंगला लावला होता. मात्र सकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नीने घरात चोरी झाल्याचे सांगितले. घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन चोरट्यानी घरात प्रवेश करून पत्नीने रात्री झोपताना डोक्याच्या बाजूला ठेवलेली ६ ग्रॅमची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, १६ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल आणि कॉम्प्युटरजवळ ठेवलेले ३ हजार ५०० रुपये रोख असा ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण यांनी भेट देऊन पंचनामा केला. गोपाळ बडगुजर यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास भास्कर चव्हाण करीत आहेत.

Web Title: At Galwade, the two stole Rs 50,000