Gaikwad to head the tribal literature convention | आदिवासी साहित्य संमेलनाध्यक्षपदी गायकवाड
आदिवासी साहित्य संमेलनाध्यक्षपदी गायकवाडकजगाव, ता.भडगाव : येथील आदिवासी साहित्यिक तथा बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सुनील गायकवाड यांची पाचव्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाली. तालुक्यातील वडजी येथे १७ नोव्हेंबर रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.

चाळीसगाव येथे आदिवासी साहित्य अकादमीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सदर घोषणा आदिवासी साहित्य अकादमीचे अध्यक्ष कवी रमजान तडवी यांनी केली.
बैठकीला नंदुरबार येथील कथाकार व आदिवासी साहित्य अकादमीचे विश्राम वळवी प्रमुख अतिथी होत. डॉ.वाल्मिक अहिरे, राकेश खैरनार, डॉ.राजू तडवी, प्रा.विनोद नाईक, कवी रमेश धनगर, डॉ.साधना निकम, विद्रोही कवी साहेबराव मोरे, दिनेश चव्हाण, राम जाधव, वंदना मोरे, प्रा.जितेंद्र सोनवणे, रतन मोरे, गौतमकुमार निकम कल्पना गायकवाड, शिवाजी सोनवणे, भगवान जगताप आदी उपस्थित होते. आदिवासी बोलीभाषा, लोकसाहित्य अभ्यासक , ग्रामीण कथाकार सुनील गायकवाड यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासन व आदीवासी विभाग नाशिक मार्फत आयोजित पहिल्या विभागीय आदिवासी साहित्य संमेलनाचे कथाकथन सत्र अध्यक्ष, पाचव्या उलगुलान आदिवासी साहित्य संमेलनाचे कवी संमेलनाध्यक्षपद, पहिल्या अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.


Web Title: Gaikwad to head the tribal literature convention
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.