ग.स. नोकरभरती याचिकेप्रकरणी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:48 IST2019-07-18T18:48:18+5:302019-07-18T18:48:28+5:30
अमळनेर : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.सोसायटी) या संस्थेत बेकायदेशीर नोकरभरती करीत कार्यकारी मंडळाने स्वत:चीच मुले, पत्नी ...

ग.स. नोकरभरती याचिकेप्रकरणी नोटीस
अमळनेर : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.सोसायटी) या संस्थेत बेकायदेशीर नोकरभरती करीत कार्यकारी मंडळाने स्वत:चीच मुले, पत्नी व रक्तातील नातेवाईकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. तसेच सहकार कायद्यान्वये मार्गदर्शक तत्त्वे, परिपत्रकांचा अवलंब केला नाही. याप्रकरणी दाखल याचिकेवर १८ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने संबंधितांना तत्काळ नोटीस देण्याचे आदेशित केले. सुनावणीवेळी तक्रारदारांच्या वतीने अॅड.योगेश बोलकर यांनी न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला व मंगेश पाटील यांच्यासमोर युक्तिवाद केला, अशी माहिती योगेश सनेर यांनी दिली.