शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

भविष्यात भाजपा व सेनेची युती अशक्य, एकनाथराव खडसे यांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 00:38 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी अस्तित्वासाठी एकत्र येण्याची शक्यता

ठळक मुद्देमी भाजपा सोडणार हे राऊत सांगणारे कोण?कजर्माफी देवूनही पक्षाला त्याचा फायदा घेता आलेला नाही

जळगाव - आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होईल, त्यात भाजपा व शिवसेनेची युती होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे भाकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.मंगळवारी दुपारी ते मुक्ताईनगरातून जळगावात त्यांच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा करीत होते. आगामी विधानसभा, लोकसभा तसेच मनपा निवडणुकांबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षात गेल्या तीन वर्षात संबध ताणले गेले आहेत तसेच 3 वर्षापूर्वी जशी परिस्थितीहोती,तशीआजनाही, त्यामुळे या दोन्ही पक्षात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती होणे अशक्य वाटते. तर सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मात्र आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे. जशा निवडणुका जवळ येतील, तशी या दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढेल, असेही भाकीत खडसे यांनी व्यक्त केले. 288 पैकी 122 जागा (29 टक्के मते) भाजपाने जिंकल्या तर 71 टक्के मते इतरांना मिळाली. भाजपा, सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने मते विभागली गेली, त्याचा फायदा भाजपाला झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्यावेळी मात्र चित्र वेगळे असेल. जागा वाटपातही भाजपा-सेनेत एकमत होईल, असे वाटत नाही. कारण भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष त्यांनी जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त उरलेल्या 100 जागांवर समाधानी राहणार नाही. त्यामुळे स्वतंत्रच लढतील, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीनेपक्षतयारीलाहीलागलेअसल्याचेसध्यादिसूनयेते.

तीन वर्षाच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय राज्य शासनाने घेतले. त्यात कजर्माफीचा निर्णय सर्वात मोठा आहे. 30 हजार कोटींची कजर्माफी देवूनही पक्षाला त्याचा फायदा घेता आलेला नाही. सर्व सामान्य कार्यकर्ता पूर्वी प्रमाणे आजही सतरंज्याच उचलत असल्याने नाराज आहे. तो समाधानी नसल्याने पक्षाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होत आहे. ते ना विशेष कार्यकारी दंडाधिकारी बनले ना महामंडळावर त्यांची वर्णी लागली. पक्षा बाहेरुन आलेल्यांना पदे मिळत असल्याने निष्ठावान कार्यकत्र्या नाराज आहे. 

मी भाजपा सोडणार हे राऊत सांगणारे कोण?एकनाथराव खडसे हे भाजपात जास्त काळ थांबणार नाही..या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले,  पक्ष मोठा व्हावा यासाठी मी जळगाव जिलत खूप मेहनत घेतली. पक्षाची ताकद निर्माण केली. यश मिळवून दिले, असे असताना मी पक्ष कसा सोडणार? मी भाजपा सोडणार हे राऊत कसे सांगू शकतील. मी भाजपात आहे व भाजपातच रहाणार.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाShiv Senaशिवसेना