बोदर्डे वंजारी गावासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:56+5:302021-08-17T04:22:56+5:30
बोदर्डे व वंजारी गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जळगाव यांच्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी ...

बोदर्डे वंजारी गावासाठी निधी कमी पडू देणार नाही
बोदर्डे व वंजारी गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जळगाव यांच्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर रोड ते बोदर्डे गावापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण १.६० कि.मी., ८०.३८ लक्ष व पारोळा ते वंजारी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण १.५० कि.मी,८०.२५ लक्ष रुपयांचे कामाचे भूमिपूजन बोदर्डे -वंजारी येथे करण्यात आले. प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, अमळनेरचे माजी नगराध्यक्ष एल.टी.पाटील, जि. प. सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, उद्योगपती व महाळपूरचे सरपंच सुधाकर पाटील, प्राचार्य एस. व्ही. पाटील, भोकरबारी सरपंच राहुल पाटील, खेडीढोक उपसरपंच बाळू पाटील, प्रदीप राजपूत, दिगंबर पाटील, दगडी सबगव्हाण सरपंच नंदलाल पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अनिल चौधरी यांनी मानले.