निधी संकलन रॅलीने वेधले लक्ष..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:40 IST2021-01-13T04:40:47+5:302021-01-13T04:40:47+5:30

रॅलीच्या उद्घाटना वेळी गुरूद्वारामधील सेवेकरी ज्ञानप्रीत सिंग ,विश्व हिंदू परिषदेचे देवेंद्र भावसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितेश पवार, ह .भ. ...

Fundraising Rally | निधी संकलन रॅलीने वेधले लक्ष..

निधी संकलन रॅलीने वेधले लक्ष..

रॅलीच्या उद्घाटना वेळी गुरूद्वारामधील सेवेकरी ज्ञानप्रीत सिंग ,विश्व हिंदू परिषदेचे देवेंद्र भावसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितेश पवार, ह .भ. प. योगेश महाराज ,राकेश लोहार, निखिल घोलप आदी नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला पुष्पहार अर्पण करुन रॅलिची सुरुवात करण्यात आली . शिवतीर्थ मैदाना पासून निघालेली ही रॅली स्टेडियम चौक, रिंग रोड , कोर्ट चौक , नेहरू चौक, टॉवर चौक , रथ चौक , पांडे चौक, डी मार्ट ,काव्यरत्नावली चौक व मु. जे. महाविद्यालय मार्गे आकाशवाणी चौकातील बाबा टॉवर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेद महाजन उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कवी कासार मिलिंद चौधरी, पियुष श्रावगी, रितेश चौधरी, मानत शर्मा, शुभम सोनार ,राकेश लोहार, समाधान पाटील, राजेंद्र नन्नवरे आदींनी परिश्रम घेतले.

इन्फो :

महापौरांकडून रॅलीवर फुलांचा वर्षांव

टॉवर चौकाकडून ही रॅली रथ चौकाकडे जात असतांना प्रताप चौकात महापौर भारती सोनवणे यांनी फुलांची उधळण करत रॅलीचे जंगीस्वागत केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Fundraising Rally