‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानाला भरुभरुन प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:10+5:302021-07-08T04:13:10+5:30

यांनीही केले रक्तदान अमळनेर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानाला बुधवारी अमळनेर येथे जोरदार प्रतिसाद मिळाला. आमदार अनिल पाटील ...

Full response to the 'Lokmat Raktac Naat' campaign | ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानाला भरुभरुन प्रतिसाद

‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानाला भरुभरुन प्रतिसाद

यांनीही केले रक्तदान अमळनेर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानाला बुधवारी अमळनेर येथे जोरदार प्रतिसाद मिळाला. आमदार अनिल पाटील यांच्यासह ६० जणांनी रक्तदान करून महायज्ञास हातभार लावला.

बसस्थानकाच्या मागे असलेल्या गं.स.हायस्कूल येथे झालेल्या या शिबिरात आमदार अनिल पाटील यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्‌घाटन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, एपीआय राकेश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, हेकॉं. संजय पाटील, डॉ शरद पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, धनगर समाजाचे ज्ञानेश्वर धनगर यांनी रक्तदान केले. इम्रान खाटीक यांनी १६ वेळा तर माजी सैनिक पंकज पाटील यांनी ८ वेळा रक्तदान केले.

शिबिरास नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. शिबिरास मंगळग्रह मंदिर परिवार, अमळनेर टॅक्सी युनियन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, खान्देश शिक्षण मंडळ , माझं गाव माझं अमळनेर ग्रुप, विविध समाजसेवी संस्था, मनोज शिंगाणे आदींचे सहकार्य लाभले. प्रत्येक रक्तदात्याला लोकमत व इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.

ए पॉझिटिव्ह

मिलिंद वाघ, किशोर पाटील , गणेश चव्हाण ,राहुल मोरे, प्रशांत पाटील,(इगन)सचिन पाटील, योगेश येवले, प्रवीण भंडारी, यशवंतलाल पाटील, संजय पाटील, इम्रान खातिक, अमोल मराठे, अतुल दीक्षित, राहुल कुंजर ,हेमंत महाजन, मनोहर पाटील, भूषण भदाणे, भाऊसाहेब पाटील, नितीन चौधरी, रोहित लोहरे, संजय चव्हाण.

बी पॉझिटिव्ह

अनिल पाटील, योगेश भागवत, पारस धाप, प्रशांत काटकर, रंणछोड देसले, मनोहर पाटील, अरुण केळकर, विजय पवार, मुकेश पाटील, राकेशसिंग परदेशी,उमेश कलोसे,गणेश सपकाळे, तौसिफ रजा शेख.

ओ पॉझिटिव्ह

प्रांत सीमा अहिरे, डॉ. शरद पाटील , विनोद जाधव,गणेश भामरे, नरेंद्र निकम, पंकज पाटील, राकेश साळुंखे, सागर कोळी, सुमित पाटील, प्रवीण पाटील, प्रकाश पाटील, नीलेश भंडारी, दीपक सुरळकर, राजेंद्र पाटील, भूषण चौधरी, प्रेरणा वड्याळकर, विश्वनाथ बिऱ्हाडे, नरसिंग वाघ, मझहरखान पठाण , कल्पेश सूर्यवंशी.

एबी पॉझिटिव्ह

ज्ञानेश्वर धनगर , अमोल पाटील , विपुल चव्हाण.

ओ निगेटिव्ह

किरण पाटील , प्रसाद भंडारी,उमेश पाठक.

ए निगेटिव्ह

ईश्वरलाल पाटील

Web Title: Full response to the 'Lokmat Raktac Naat' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.