चोपडा येथे भरला बैल बाजार, लाखोंची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:29+5:302021-06-21T04:13:29+5:30
दि. २० रोजी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळपासूनच शेतकरी व व्यापारी बैलांच्या विक्रीसाठी आपले पशुधन घेऊन येत ...

चोपडा येथे भरला बैल बाजार, लाखोंची उलाढाल
दि. २० रोजी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळपासूनच शेतकरी व व्यापारी बैलांच्या विक्रीसाठी आपले पशुधन घेऊन येत होते. पुढील काळात पेरणी, कोळपणी आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात बैलांची आवश्यकता असल्याने या दिवसांत बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी चोपडा हे सातपुड्याच्या अगदी जवळ असल्याने तापी खोऱ्यापासून ते सातपुड्यातील पाड्यावस्तीवरील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल
वर्षभरापासून कोरोनाच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याला भाव नसल्याने उत्पन्न खर्च निघण्याची मारामार असल्याने आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला शेती कसण्यासाठी महागडे पशुधन घ्यावे लागत असल्याने फार ओढाताण करून रक्कम जमवावी लागत आहे. वाढीव भावाने बैलांची खरेदी नाइलाजास्तव करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
साठ हजारांपासून ते नव्वद हजारापर्यंत किमतीचे व्यवहार एका बैजोडीचे झालेत.
===Photopath===
200621\20jal_15_20062021_12.jpg
===Caption===
चोपडा येथे भरला बैल बाजार,लाखोंची उलाढाल