तरुणाच्या खून प्रकरणी फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:11+5:302021-07-28T04:17:11+5:30
भुसावळ : शहरात जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोर १५ जुलै रोजी वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने मित्राची ...

तरुणाच्या खून प्रकरणी फरार आरोपी जेरबंद
भुसावळ : शहरात जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोर १५ जुलै रोजी
वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने मित्राची
लोखंडी फावडे व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली होती. या घटनेत सचिन ज्ञानदेव भगत (३२) रा. श्रद्धानगर, भुसावळचा मूत्यू झाला. या खुनानंतर फरार झालेला आरोपी प्रदीप छगन आलवे (३०) रा. तितरायण्या, मध्यप्रदेश यास पाल, ता. रावेर जवळील एका छोट्या गावातून जेथे मोबाइलची रेंज सुद्धा नाही, अशा ठिकाणाहून मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली.
१६ रोजी शहरात रक्तरंजित पहाट उजाडली होती. यात सचिन भगत या तरुणाच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी केलेल्या पार्टीतच वाद ओढावल्याने प्रशांत ऊर्फ मुन्ना संजय चौधरी (२९) रा. पंढरीनाथनगर, भुसावळ याने अन्य मित्रासह सचिनचा डोक्यावर लोखंडी फावडे व धारदार शस्त्र मारून खून केला होता. सुरुवातीला या गुन्ह्यात मुन्ना चौधरी यास अटक करण्यात आली होती. सचिन भगत या तरुणाच्या खून प्रकरणी मयताची पत्नी सपना सचिन भगत यांच्या फिर्यादीनुसार मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा व अन्य इसमांविरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक
चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र बिऱ्हाडे, नाईक किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, जीवन कापडे, योगेश माळी, परेश बिऱ्हाडे आदींनी आरोपींना जेरबंद केले.