शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

उपासनेचे फळ : रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:04 IST

सुख आणि दु:ख हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा माणसावर संकट येते तेव्हा तो दु:खी होतो आणि जेव्हा ...

सुख आणि दु:ख हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा माणसावर संकट येते तेव्हा तो दु:खी होतो आणि जेव्हा आनंद येतो तेव्हा तो समाधानी असतो. वर्षभरात आम्ही काही सण साजरा करतो जे आपल्या आनंदाचे स्रोत असतील? जेव्हा आम्ही आपल्या जीवनात सर्व प्रकारची चिंता आणि आर्थिक जबाबदाऱ्यांपासून काही क्षण मुक्त राहून आनंदाची वेळ घालवतो, त्याला सण म्हणतात. आपल्या जीवनात आनंदाचे सण साजरी करणे याचा मोलाचा स्थान आहे.ईदुल-फित्र हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचा मोठा उत्सव आहे, जो दरवर्षी रमजान महिन्याच्या उपवासानंतर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईद नक्कीच आनंदाचा सण आहे पण यंदाच्या ईदमध्ये आपल्याला जबाबदार वृत्ती आणि दृढनिश्चयाने कोरोना महामारीला धैर्याने तोंड देण्याची आहे. जीवनात अनेक समस्या उद्भवतात, परंतु यामुळे निराश होता कामा नये. अशा परिस्थितीत काही लोक असे म्हणत आहेत की, आम्ही ईद साजरी करणार नाही. या विचारसरणीमागे देशप्रेम आणि मानवतेचा भाव आहे.ईद हा आपल्या महिन्याभराच्या उपासनेबद्दल अल्लाहचे समोर नतमस्तक होउन आभार मानण्याचा दिवस आहे. ईद हा आपल्या गरीब बांधवांना मदत करण्याचा दिवस आहे. गरजू लोकांना आधार देण्याचा दिवस आहे. प्रेम सामायिक करण्याचा आणि तुटलेला संबंध जोडण्याचा दिवस आहे. या दिवशी आनंद व्यक्त करणे ही शरीयतची आज्ञा आहे. चांगले कपडे घालणे, सुगंध लावणे आणि गोड खाणे ही आपली परंपरा आहे. आपण बाजारात गेलो नाही, हे चांगले केले. वाचवलेले पैसे त्यांच्यावर खर्च करुन ईद साजरी करा ज्यांच्याकडे अद्याप औषध आणि खाण्यासाठी पैसे नाहीत. यापूर्वी तुम्ही अनेकवेळा ईद साजरी केली असेल. यंदाची ईद आपल्या जीवनाची पहिली आणि अनोखी ईद असेल. कारण दुसऱ्यांच्या आनंदासाठी त्याग करण्याचे सुख वेगळे असतात. आपल्याला नक्कीच मानसिक शांती आणि आत्मिक समाधानचा अनुभव मिळेल. कोरोना रूग्णांना आपल्या आनंदाचा एक भाग बनवा. त्यांचा द्वेष करु नका, त्यांच्याशी भेदभाव करू नका. त्यांना मदत करा. ज्यांचे प्रियजन या आजाराने ग्रस्त आहेत त्यांचे सांत्वन करा. या आनंदमय दिवशी घरीच नव्हे तर रुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसात ज्यांनी आपले प्रियजन हरवले आहे, त्यांचे दु: ख सामायिक करण्याचा प्रयत्न करा. टाळेबंदीने दारिद्र्य आणि बेरोजगारीलाही तीव्र केले आहे. त्यापासून प्रभावित लोकांना आपल्याला मदत करण्याची आवश्यकता आहे? ईदचा हादेखील महत्त्वाचा हेतू आहे. म्हणूनच ईदच्या नमाजच्या आधी सदाका-ए-फित्र अदा करण्यावर भर देण्यात आला आहे .आपण आपल्या गरीब शेजाºयांना आणि गरीब नातेवाईकांना ईदच्या आनंदात सहभागी केल्याशिवाय ईद साजरा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ईदच्या दिवशी लोकांना नक्की भेटा परंतु थोड्या अंतरावर. पण हे अंतर मनाचे अंतर होऊ देऊ नका. आनंदी व्हा आणि लोकांसह आनंदात सहभागी व्हा .ईदच्या या आनंदमय दिवशी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा.-काजी मुजम्मिलोद्दीन नदवी

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव