अमळनेर तालुक्यात वृक्षलागवडीचा मैत्री पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:32+5:302021-08-24T04:22:32+5:30

संजय पाटील अमळनेर : तालुक्यातील तांदळी गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे समृद्धगाव योद्धे शेतकरी योगेश तिरमले व पशुुधन डॉ. प्रभूसिंह परदेसी ...

Friendship pattern of tree planting in Amalner taluka | अमळनेर तालुक्यात वृक्षलागवडीचा मैत्री पॅटर्न

अमळनेर तालुक्यात वृक्षलागवडीचा मैत्री पॅटर्न

Next

संजय पाटील

अमळनेर : तालुक्यातील तांदळी गावांमध्ये पाणी फाउंडेशनचे समृद्धगाव योद्धे शेतकरी योगेश तिरमले व पशुुधन डॉ. प्रभूसिंह परदेसी या दोन ध्येयवेड्या वृक्ष मित्रांच्या जिद्द व चिकाटीमुळे तांदळी गावांमध्ये ११०० वृक्षांची वृक्ष लागवड करण्यात आली.

तांदळी या गावांमध्ये गेल्या वर्षी ५०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते; पण त्या कामामध्ये काही अडचणीमुळे ती वृक्ष लागवड यशस्वी झाली नाही. त्या अडचणींचा सर्व विचार करून यावर्षी ११०० वृक्षांची वृक्ष लागवड करण्याचे बैठकीमध्ये ठरले, अशी पंचायत समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यासाठी मंजुरीदेखील मिळाली, पण ऐनवेळेला फक्त १२ मजूर बांधवांनी मागील वर्षीचे कारण सांगून वृक्ष लागवड करण्यासाठी नकार दिला.

ऐनवेळी काय करावे हे काही सूचेना, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा दोन वेळेला मीटिंग घेण्यात आली व लोकांना समजून सांगण्यात आले त्यावेळी डॉक्टर प्रभूसिंह परदेशी व योगेश तिरमले या दोघांनीच वृक्ष लागवड करण्यासाठी होकार दर्शविला. त्यांनी खड्डे काढण्याचे काम सुरूदेखील केले. त्यांचे काम पाहून त्यांना इतर २० मजूर बांधवांनी परत सहकार्य केले, त्याच बरोबर अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांना ही वस्तुस्थिती सांगितल्यावर या ध्येयवेड्या वृक्षमित्रांना आधार दिला.

गेल्यावर्षी सारख्या आपणास यावर्षी अडीअडचणी येणार नाही, याची शाश्वती दिली. यामुळे या तिरमले व परदेशी या दोघांना खूपच मोठा आधार मिळाला. यासाठी तांदळी गावचे ग्रामसेवक, रोजगारसेवक, सरपंच यांनीदेखील मदतीचा हात पुढे केला. तांदळी गावांमध्ये पुन्हा वृक्षलागवडीची चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांतून यश मिळाले. हा खरे तर अमळनेर तालुक्यात वृक्षलागवडीचा मैत्री पॅटर्न ठरला आहे.

फोटो

Web Title: Friendship pattern of tree planting in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.