लग्न सोहळ्यात नाचताना वराच्या मित्राचा मृत्यू

By Admin | Updated: May 16, 2017 17:28 IST2017-05-16T17:09:38+5:302017-05-16T17:28:21+5:30

संजय चौधरी हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता.

The friend's friend's death in a wedding ceremony | लग्न सोहळ्यात नाचताना वराच्या मित्राचा मृत्यू

लग्न सोहळ्यात नाचताना वराच्या मित्राचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 16 -  मित्राच्या  लग्नसोहळ्यात नाचत असताना संजय दौलत चौधरी (36) या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना 15 रोजी रात्री 11.30 वाजता नीम येथे घडली.
मूळचा नीम येथील रहिवासी संजय चौधरी हा पुणे येथे एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. त्याची पत्नी , मुलगा, मुलगी हे सुट्ट्यांमध्ये नीम येथे आले होते. संजयचा मित्र योगेश दत्तात्रय पाटील याचे 16 रोजी लग्न असल्याने, तसेच पत्नी व मुलांना पुणे येथे घेऊन जाण्यासाठी तो गावी आलेला होता. लग्नाच्या आदल्या रात्री  नाचता नाचताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूमुळे योगेश पाटील यांचा विवाह समारंभ अगदी साध्या वातावरणात पार पडला.

Web Title: The friend's friend's death in a wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.