खेडेगाव नंदीचे येथे अनुकूल तंत्रज्ञान कृषी कार्यशाळा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:12+5:302021-09-14T04:19:12+5:30
कुरंगी, ता. पाचोरा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभागांतर्गत खेडेगाव नंदीचे (ता. पाचोरा) येथे भरतसिंग सूरसिंग ...

खेडेगाव नंदीचे येथे अनुकूल तंत्रज्ञान कृषी कार्यशाळा कार्यक्रम
कुरंगी, ता. पाचोरा :
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभागांतर्गत खेडेगाव नंदीचे (ता. पाचोरा) येथे भरतसिंग सूरसिंग पाटील यांच्या शेतात कापूस या पिकावर हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये फवारणी करताना घ्यायची दक्षता, डोमकळी,
गुलाबी बोंड अळी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
शत्रू किडी व मित्र किडी २ टक्के डीएपी फवारणी आणि मावा, तुडतुडे, पांढरी माशी, मित्र कीड ओळख, अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी मित्र ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
उपस्थित शेतकऱ्यांना टोपी वाटप करण्यात आली. उविकृ अधिकारी नयनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
मार्गदर्शक म्हणून शेतीशाळा समन्वयक प्रदीप बडगुजर, शेतीशाळा प्रशिक्षक रोहित वाघ उपस्थित होते.