शुक्रवारी कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:02+5:302021-09-16T04:23:02+5:30
जळगाव : भारत विकास परिषद संचालित संपर्क फाउंडेशनतर्फे रुग्ण साहित्य लायब्ररीचे लोकार्पण व कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान सोहळा शुक्रवार, ...

शुक्रवारी कोरोना योद्ध्यांचा सन्मान
जळगाव : भारत विकास परिषद संचालित संपर्क फाउंडेशनतर्फे रुग्ण साहित्य लायब्ररीचे लोकार्पण व कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान सोहळा शुक्रवार, १७ रोजी दुपारी ४.३० वाजता महेश प्रगती हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय वित्त सचिव संपत खुरदिया व खासदार उन्मेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, तर सुधीर पथक, गोपाल होलाणी, आमदार सुरेश भोळे, जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण, नीलेश पाटील, रजनीकांत कोठारी यांची उपस्थिती असणार आहे.
००००००००००००
अभियंता दिन साजरा
जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी अभियंता जी. एच. राजपूत, उपकार्यकारी अभियंता एस. बी. पाटील, सहायक अभियंता सुभाष राऊत, शाखा अभियंता जितेंद्र महाजन, अभिषेक सूर्यवंशी, भूषण घुगे, भूपेंद्र रायसिंगे, योगेश अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.