रावेर येथे शालेय आहार पोषण अधीक्षक व शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल

By Admin | Updated: April 13, 2017 17:03 IST2017-04-13T17:03:28+5:302017-04-13T17:03:28+5:30

रावेर शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी आणि जि.प. शिक्षकांमध्ये जोरदार फ्रीस्टाईल झाली.

Freestyle in school nutrition superintendent and teachers at Raver | रावेर येथे शालेय आहार पोषण अधीक्षक व शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल

रावेर येथे शालेय आहार पोषण अधीक्षक व शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल

 रावेर,दि.13- शालेय  पोषण आहार अधीक्षक अजित तडवी आणि जि.प. शिक्षकांमध्ये जोरदार फ्रीस्टाईल  झाली. भर दुपारी पंचायत समितीच्या सभापती माधुरी गोपाळ नेमाडे यांच्या दालनात ही घटना घडली.

गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुख्याध्यापक व उपशिक्षक तडवी यांची तक्रार घेऊन आले होते.त्यावेळी पं.स.सभापती दालनात पं.स.सदस्य जितेंद्र पाटील, पी.के.महाजन, जि.प.सदस्या नंदा पाटील यांचे पती अमोल पाटील, पं.स.सदस्या धनशी सावळे यांचे पती संदीप आदी समोर त्यांनी व्यथा मांडताना अजित तडवी यांनी संताप व्यक्त करीत शिक्षकांना मारहाण केलीे. दरम्यान पोलीस ठाण्यात सभापती माधुरी नेमाडे व उपसभापती अनिता चौधरी यांच्या उपस्थितीत तडवी यांच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Freestyle in school nutrition superintendent and teachers at Raver