अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 14:54 IST2017-03-19T14:54:17+5:302017-03-19T14:54:17+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले

अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब
ऑनलाइन लोकमत
जळगाव,दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले आपण ओळखली पाहिजे शेतकरी कुठला आहे त्यापेक्षा त्याच्या दुखाची ठणक आपली समजून त्याच्या मदतीला धाऊन येण्याची गरज असून अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी असे मत आंदोलनाचे प्रनेते अमर हबीब यानी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे याना श्रध्दांजली अपॅन करताना बोलत होते.
आज सकाळी 10 वाजता अमर हबीब महागाव येथे बस स्थानका समोर हजारो समथॅकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.
साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धाजली अर्पन करून पुष्प हार आर्पन करतांना मा रविकांत तुपकर ,अमर हबीब , डॉ विश्वनाथ विनकरे , देवेंद्र भुयार , सुरेश रोहणेकर शरद पाटील ,जगदिश नरवाडे, नगराध्यक्ष ,सुनिल नरवाडे, उदय नरवाडे, प्रा विलास भवरे , योगेश वाजपेयी, माजी जि प अध्यक्ष भाऊराव चौधरी , संदिप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटणेचे तालुका अध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार , अॅड विवेक देशमुख मनिष जाधव , विनोद पाटील , गोपाल चव्हान, सतिष चव्हान , प्रशांत ठाकरे, प्रदिप पाटील , मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मीथुल अलाटे, गौरव नाईकर , सुधाकर जाधव पुर्शेत्तम राठोड नगरसेवक नारायण शिरबीरे , रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतकर्यासह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते , तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधुन शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला तर सर्वांनी त्यांना श्रध्दांजली आर्पन केली