इनरव्हीलतर्फे मोफत प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:32+5:302021-09-02T04:35:32+5:30
भुसावळ : आधुनिक युगात जास्तीत जास्त मुलींनी स्वावलंबी व्हावे आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, या ...

इनरव्हीलतर्फे मोफत प्रशिक्षण शिबिर
भुसावळ : आधुनिक युगात जास्तीत जास्त मुलींनी स्वावलंबी व्हावे आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे एकूण १० गरजू मुलींना ब्यूटिपार्लरच्या तीन महिने कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
"ब्यूटिफिकेशन ॲण्ड हेअरस्टाइल" ह्या कोर्सचे संपूर्ण प्रशिक्षण 'सौम्या स्पा ॲण्ड सलून'मध्ये क्लब अध्यक्षा व ब्यूटिशियन स्मिता चौधरी यांनी स्वतः दिले.
या उपक्रमाचा १० गरजू विद्यार्थिनींनी लाभ घेतला. हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दलचे सर्टिफिकेट वितरण समारंभ नुकताच पार पडला.
याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा स्मिता चौधरी, माजी अध्यक्षा सुनीता पाचपांडे, डाॅ. मृणाल पाटील, मोना भंगाळे, कोषाध्यक्षा रेवती मांडे, इतर सदस्या कविता पाचपांडे, विनीता नेवे आणि आरती चौधरी आदी उपस्थित होत्या.