महामार्गावर पतीपत्नीमध्ये फ्री स्टाईल
By Admin | Updated: March 27, 2017 17:26 IST2017-03-27T17:26:47+5:302017-03-27T17:26:47+5:30
मुंबई येथून नागपूरला जात असताना कारमध्ये पतीपत्नीमध्ये खटके उडाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरच दोघांमध्ये फ्री स्टाईल सुरू झाली.

महामार्गावर पतीपत्नीमध्ये फ्री स्टाईल
जळगावात गोंधळ : पोलिसांनी केली कारवाई
जळगाव, दि.27- मुंबई येथून नागपूरला जात असताना कारमध्ये पतीपत्नीमध्ये खटके उडाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरच दोघांमध्ये फ्री स्टाईल सुरू झाली. मानराज पार्कजवळ हा प्रकार घडला. हा प्रकार सुरू असताना तरुणीचे अपहरण होत असल्याच्या संशयाने रस्त्यावरील नागरिकांनी धाव घेऊन तरूणाला पकडले. तरुणाला त्याला बदडण्याची तयारी असतानाच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले.
उत्तम जंगल मेंढे व त्याची पत्नी संजना (वय 30 रा.नागपूर) हे दोघं मुंबई येथून कारने नागपूरला जात असताना रस्त्यात त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यावसन महामार्गावर कार थांबवून हाणामारीत झाले. हा प्रकार पाहून काही वाहनधारक थांबले. हा तरुण मला पळवून नेऊन ठार मारण्याचा प्रय} करीत असल्याचा आरोप तरुणीने केल्याने नागरिकांना हा प्रकार खरा वाटला. तिला त्याच्या तावडीतून सोडवून मारहाण करणार तितक्यात पोलिसांचे पथक तेथे पोहचले. त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनला आणले.
पोलीस स्टेशनला फुटले बिंग
पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता उत्तम याला पहिली पत्नी असून तिच्यापासून एक अपत्यही आहे. संजना हिच्याशी वर्षभरापूर्वी त्याने प्रेमविवाह केला. पूर्वी लगA झाले असल्याची माहिती उत्तमने लपविल्यामुळे दोघांचा वादाला सुरु झाला. मुंबई येथून निघतांना रस्त्यात त्र्यंबकेश्वर येथे दोघांनी विधीवत पूजाविधी केला. तेथून नागपूरला जात असताना कारमध्ये पुन्हा वाद झाला. दरम्यान,कौटुंबिक कारणातून उत्तम याने मारहाण केल्याची तक्रार संजना हिने पोलिसांकडे केली. त्यानुसार त्याच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
संजनाची सुधारगृहात रवानगी
संजना हिला माङयासोबत परत पाठवा असा आग्रह उत्तम करीत असताना तिने मात्र त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिची आशादीप वसतीगृहात रवानगी केली तर उत्तम याच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी दोघांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.