एसएसबीटीत विनामूल्य ऑनलाइन शिक्षण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:40+5:302021-09-04T04:21:40+5:30

जळगाव : अभियांत्रिकी विद्याशाखेच्या द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेन प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयातील ई ॲण्ड ...

Free online learning activities at SSBT | एसएसबीटीत विनामूल्य ऑनलाइन शिक्षण उपक्रम

एसएसबीटीत विनामूल्य ऑनलाइन शिक्षण उपक्रम

जळगाव : अभियांत्रिकी विद्याशाखेच्या द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेन प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयातील ई ॲण्ड टीसी विभागातर्फे विनामूल्य ऑनलाइन शिक्षण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या विनामूल्य शिक्षण उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयांकडून करण्यात आले आहे.

थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही लांबत जाते. त्यामुळे सुरुवातीला शिकवण्यात येणारा एक ते दीड महिन्यातील अभ्यासक्रमाला या विद्यार्थ्यांना मुकावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. असे होऊ नये म्हणून ई ॲण्ड टीसी विभागातर्फे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्राचे ऑनलाइन वर्ग १३ सप्टेंबरपासून नियोजित करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थांनी डॉ. एस. आर. सुरळकर, डॉ. एम. पी. देशमुख, डॉ. पी. जे. शहा, डॉ. व्ही. एम. देशमुख, डॉ. पी. एच. झोपे यांच्याशी संपर्क साधावा, असे महाविद्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Free online learning activities at SSBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.