भुसावळ येथे प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:47 IST2018-12-21T22:46:21+5:302018-12-21T22:47:23+5:30
भुसावळ येथील खडका रोड भागातील प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथे प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ येथील खडका रोड भागातील प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा शांताराम सनासे (रा. शिक्षक कॉलनी, रावेर) यांची शहरातील खडकारोड भागातील सर्वे क्रमांक १०/१ प्लॉट नं १८ क्षेत्र २१३/७५ हा प्लॉट १८ फेब्रुवारी २०१८ रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खोटी कागदपत्रे तयार करुन ती खरी भासवून जमिनीची अप्रामाणिकपणे विक्री करुन फसवणूक केली.
याप्रकरणी दुर्गा सनासे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात भा.दं.स. ४२०, ४६८, ४७०, ४७१ प्रमाणे फारुख शेख, हबीब शेख, अनिल कोळी व अज्ञात महिला या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक के.टी. सुरळकर तपास करीत आहे.