शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर खरेदीत शेतकऱ्याची सव्वा लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 20:28 IST

गुन्हा दाखल : ऑनलाईन साइर्डवर दाखविले ट्रॅक्टर

जळगाव : ओएलएक्स या ऑनलाईन साईडवर ट्रॅक्टर विक्रीबाबत आलेल्या माहितीवर विश्वास ठेऊन व्यवहार करणे शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. अशोक विश्वनाथ बारसे (५०, रा.शिवाजी नगर) या शेतकऱ्याची १ लाख ३० हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक विश्वनाथ बारसे यांना शेतीच्या कामासाठी ट्रक्टरची आवश्यकता असल्याने मित्र धनराज भगवान करे (रा.जळके ता.जळगाव) यांच्या ओलक्स ॲपवर अशोकसिंग गुजर यांचे ट्रॅक्टर विक्रीला असल्याचे समजले. दोघांनी ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपूर्ण माहिती संकलीत केली. अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली. त्यानुसार निम्मे रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोंडी बोलणीत ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नोव्हेंबरला नरेश कुमार याच्या कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड याच्या खात्यावर दाणाबाजार शाखेच्या स्टेट बँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले. बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक बारसे यांनी मंगळवारी अशोकसिंग गुर्जर विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नादुरकर करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव