बनावट कागदपत्रांद्वारे पीककर्ज घेऊन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:28 IST2016-07-20T00:28:01+5:302016-07-20T00:28:01+5:30
शेतीसंदर्भात बनावट कागदपत्रे तयार करून बँकेतून पीककर्ज घेतल़े

बनावट कागदपत्रांद्वारे पीककर्ज घेऊन फसवणूक
धुळे : शेतीसंदर्भात बनावट कागदपत्रे तयार करून बँकेतून पीककर्ज घेणा:या 10 संशयितांविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शिंदखेडा तालुक्यातील जुनवणे येथील मनोज गुलाब खैरनार (शाखा व्यवस्थापक) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आह़े स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे शाखेत शेतीचे बनावट आणि खोटे कागदपत्र सादर केल़े बनावट दस्तावेज तयार करून त्याचा वापर करत शेतीविषयक कर्ज प्रकरण दाखल केल़े मिळालेले 45 लाख 54 हजार रुपये काढून घेतल़े हा प्रकार 16 जुलै 2011 ते 4 सप्टेंबर 2012 या काळात फसवणूक करण्याच्या उद्देशाने घडला़ याप्रकरणी विश्वास पुंजू पाटील, विक्रम राजाराम पाटील, शिवाजी भाईदास पाटील, जयश्री दिलीप पाटील, दिलीप साहेबराव देसले, त्रिवेणीबाई साहेबराव पाटील, सुनील प्रताप नगराळे, दगडू गंगाराम पाटील, कलाबाई विश्वास भदाणे, जगदीश देवीदास भदाणे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420़, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े