जळगाव शहरात फायनान्सद्वारे मोबाईल खरेदीत दुकानदार व ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:33 IST2018-03-15T21:33:45+5:302018-03-15T21:33:45+5:30
फायनान्सद्वारे ग्राहकांना मोबाईल खरेदी करुन दुकानदाराची फसवणूक करणाºया रवींद्र सुरेश पवार (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जळगाव शहरात फायनान्सद्वारे मोबाईल खरेदीत दुकानदार व ग्राहकांची फसवणूक
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५ : फायनान्सद्वारे ग्राहकांना मोबाईल खरेदी करुन दुकानदाराची फसवणूक करणाºया रवींद्र सुरेश पवार (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रवींद्र पवार हा बजाज फायनान्स कंपनीचा एजंट सांगतो व या कंपनीच्या माध्यमातून कर्ज प्रकरण करुन देतो असे सांगून त्याने दीपक सुरेशकुमार कुकरेजा, कार्तिक भावेश ठक्कर व साईदास महाराज या तिघांची फसवणूक केली आहे. कुकरेजा यांच्याकडून ९ हजार ५०० रुपयांचा मोबाईल, ठक्कर यांच्याकडून ५५ हजार रुपये रोख व साईदास महाराज यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ९४ हजार ५०० रुपयांचा गंडा पवार याने घातला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, संजय शेलार, अमोल विसपुते व ओमप्रकाश पंचलिंग यांच्या पथकाने पवार याला दुपारी अटक करुन न्यायालयात हजर केले. तपास संजय शेलार करीत आहे.