चोपड्यात आढळले कोल्ह्याचे पिल्लू, वनविभागाने घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:16+5:302021-06-22T04:12:16+5:30

बडगुजर गल्लीतील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीच्या कोपऱ्यात अंदाजे दोन ते तीन महिने वयाचे कोल्ह्याचे ...

The fox cub found in the book was taken into custody by the forest department | चोपड्यात आढळले कोल्ह्याचे पिल्लू, वनविभागाने घेतले ताब्यात

चोपड्यात आढळले कोल्ह्याचे पिल्लू, वनविभागाने घेतले ताब्यात

बडगुजर गल्लीतील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीच्या कोपऱ्यात अंदाजे दोन ते तीन महिने वयाचे कोल्ह्याचे पिल्लू बसले होते. सकाळी या पिलाची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी पिल्लू बघण्यासाठी एकच गर्दी केली. यानंतर सर्पमित्र सागर बडगुजर यांनी वनविभागाला या कोल्ह्याच्या पिलाबद्दल कळिवले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पिंजरा गाडी घेऊन या ठिकाणी दाखल झाले. भेदरलेल्या अवस्थेतील या पिलाला पकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला लासूर येथील जंगलात सोडून

दिले.

सहाय्यक वनसंरक्षक एस. के. शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे, वनरक्षक जी.के. गोपाल, डी.पी. देवरे, वनपाल सरदार व सर्पमित्र संदीप मालचे यांनी या पिलाला पकडून काळजी घेतली.

कोट

जंगलात प्राणी असणे ही सुचिन्हे जिल्ह्यातील बऱ्याच वनक्षेत्रात आजही अनेक जंगली प्राण्यांचा वावर आढळून येतो, हे जंगल शाबूत असणे आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी सुरक्षित असल्याचे सुचिन्ह आहे. जिल्ह्यात नीलगाय, हरीण, अस्वल, बिबटे, जंगली ससा यासारखे अनेक प्राणी वेळोवेळी आढळून आले आहेत.

एस. के. शिसव, सहाय्यक वनसंरक्षक. चोपडा

Web Title: The fox cub found in the book was taken into custody by the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.