चोपड्यात आढळले कोल्ह्याचे पिलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:47+5:302021-06-22T04:12:47+5:30

येथील बडगुजर गल्लीतील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीच्या कोपऱ्यात अंदाजे दोन ते तीन महिने वयाचे ...

The fox cub found in the book | चोपड्यात आढळले कोल्ह्याचे पिलू

चोपड्यात आढळले कोल्ह्याचे पिलू

येथील बडगुजर गल्लीतील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीच्या कोपऱ्यात अंदाजे दोन ते तीन महिने वयाचे कोल्ह्याचे पिलू दडून बसले होते. सकाळी या पिलाची चाहूल लागल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी कोल्ह्याचे पिलू बघण्यासाठी एकच गर्दी केली. यानंतर सर्पमित्र सागर बडगुजर यांनी वन विभागाला या कोल्ह्याच्या पिलाबद्दल कळवले. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पिंजरा गाडी घेऊन या ठिकाणी दाखल झाले. भेदरलेल्या अवस्थेतील या पिलाला पकडून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात लासुर येथील जंगलात सोडून दिले.

सहायक वनसंरक्षक एस. के. शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे, वनरक्षक जी. के. गोपाल, डी. पी. देवरे, वनपाल सरदार व सर्पमित्र संदीप मालचे यांनी या पिलाला पकडून योग्य ती काळजी घेत या पिलाचे पुनर्वसन केले.

जंगलात प्राणी असणे ही सुचिन्हे - शिसव

जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच वनक्षेत्रात आजही अनेक जंगली प्राण्यांचा वावर आढळून येतो. हे जंगल शाबूत असणे आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी सुरक्षित असल्याचे सुचिन्ह आहे. जिल्ह्यात नीलगाय, हरीण, अस्वल, बिबटे, जंगली ससा यांसारखे अनेक प्राणी वेळोवेळी आढळून येतात, असे सहायक वनसंरक्षक एस. के. शिसव यांनी सांगितले.

Web Title: The fox cub found in the book